रमी शब्दकोश: रमी शब्दकोश शिका
रमीच्या संज्ञांचा शब्दकोश
काही रमी संज्ञा जाणून घेण्यात अडचण येत आहे का? चिंता करू नका. JungleeRummy.com तुम्हाला सर्व प्रकारचे खेळ, संकल्पना, नियम आणि गेमप्ले! समाविष्ट करणारा सर्वसमावेशक शब्दकोष प्रदान करते भारतीय रमी खेळामध्ये सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या सर्व संज्ञांची संपूर्ण यादी आम्ही तुमच्यासाठी एकत्रित केली आहे.
101 पूल रमी: रमीच्या या भिन्नतेमध्ये प्रत्येक डावात बाद होणारा घटक असतो. एका खेळाडू व्यतिरिक्त सर्व खेळाडू 101 गुण प्राप्त करून बाद होत नाही तेवढे डाव खेळण्यापर्यंत हा खेळ चालू राहतो. हरलेल्या खेळाडूंना प्रत्येक डावाच्या शेवटी त्यांच्या न जुळलेल्या किंवा क्रमाने न लागलेल्या पत्त्यांच्या एकूण मूल्यांइतके गुण मिळतात. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या गुणांची संख्या 101 गुणांवर पोहोचते, तेव्हा तो/ती खेळातून बाद होतो/होते आणि जो खेळाडू शेवटपर्यंत टिकून राहतो त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते.
13-कार्ड रमी: या रमीच्या प्रकारात, एका खेळाडूला 13 पत्ते अनुक्रमाने (किमान एक प्युअर सिक्वेन्ससह) किंवा अनुक्रम आणि संचांमध्ये लावावे लागतात. सविस्तर तपशीलासाठी खाली दिलेले Paplu बघा
201 पूल रमी: 201 पूल रमी हा खेळ 101 पूल रमी खेळासारखाच असतो, फक्त या खेळात खेळाडू जेंव्हा 201 गुणांपर्यंत पोहोचतात तेंव्हा ते बाद होतात. जो खेळाडू 201 गुण गोळा न होऊ देता शेवटपर्यंत टिकतो तो विजेता होतो.
एक्के : रमीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 52 पत्त्यांच्या साधारण गड्डीमध्ये 4 एक्के असतात. ते किल्वर, चौकट, बदाम आणि इस्पिक अशा वेगवेगळ्या सूटमध्ये येतात एक्क्यांचा उपयोग कमी मूल्य असलेले अनुक्रम तयार करण्यासाठी केला जातो जसे एक्का, दुर्री, तिर्री, किंवा ते मोठ्या पत्त्यांचा अनुक्रम तयार करण्यासाठी वापरले जातात जसे एक्का, राजा आणि राणी. प्रत्येकाला 10 गुण असतात. जर जोकरचे चित्र असलेला जोकर, वाइल्ड जोकर म्हणून निवडला, तर एक्के देखील जोकरचे चित्र असलेल्या जोकर बरोबर वाइल्ड जोकरचे कार्य करतात
तीन डावांपैकी सर्वोत्तम डाव: हा रमीच्या डावांचा एका प्रकार आहे ज्यात खेळाडू तीन डाव खेळतात. ज्या खेळाडूने तीन डावाच्या शेवटी प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून सर्वाधिक संख्येने चिप जिंकले असतील त्याला विजेता म्हणून घोषित केले जाते.
बाय-इन: रोख रमी स्पर्धेत भाग घेण्यासाठी एखादा खेळाडू पैसे भरतो त्याला कॅश अमाउन्ट म्हणतात. याला सर्वसाधारणपणे 'प्रवेश शुल्क' म्हणून देखील म्हटले जाते, खेळाडू जे जोखमीवर ठेवतो. बाय-इन हे एकत्रितपणे बक्षिसाची रक्कम तयार करतात, जी रक्कम स्पर्धेत अव्वल कामगिरी करणारा खेळाडू जिंकतो.
कॅश गेम: रोखीचे खेळ हे प्रत्यक्ष रोख पैसे देऊन खेळले जातात आणि विजेता रोख रक्कम जिंकतो.
चकत्या: रमी खेळण्यासाठी चिपचा उपयोग आभासी पैसे म्हणून केला जातो. Junglee Rummy मध्ये, प्रत्येक खेळाडूला सराव खेळ खेळणे आणि आपली कौशल्ये वाढविणे यासाठी 10,000 सराव चिप मिळतात.
बंद डेक: याचा संदर्भ सगळ्या खेळाडूंना डावाचे पूर्ण पत्ते वाटून झाल्यावर उरलेल्या उलटे ठेवलेल्या पत्त्यांच्या गड्डीशी आहे. उलटे ठेवलेल्या पत्त्यांच्या गड्डीतून खेळाडू त्यांचा डाव आल्यावर पत्ते उचलू शकतात. खेळाडूंद्वारे सर्व पत्ते उचलेल गेल्यावर उलट्या ठेवलेल्या पत्त्यांच्या गड्डी मध्ये फेरबदल केला जातो.
डेडवुड: न जुळलेल्या पत्त्यांसाठी डेडवुड ही संज्ञा वापरली जाते. सध्या शब्दात सांगायचे तर, जे पत्ते कुठलीच संयोजनाची भाग नसतात त्यांना डेडवुड म्हणतात. साधारणपणे हरणाऱ्या खेळाडूंकडे डेडवुड असतात.
डील्स रमी: रमीच्या या प्रकारात, खेळाडूंना, आधी ठरविलेल्या डावाच्या संख्येसाठी एका ठराविक संख्येत चिप दिले जातात (साधारणपणे 2, 3 किंवा 6). प्रवेश शुल्क भरल्यानंतर, प्रत्येक खेळाडूला खेळाच्या सुरुवातीला चिप मिळतात. नंतर प्रत्येक डावाच्या विजेत्या खेळाडूला, हरणाऱ्या खेळाडूंकडून सर्व चिप मिळतात. अंतिम डावाच्या शेवटी सर्वाधिक चिप ज्याच्या जवळ असतील तो खेळाडू अंतिम विजेता ठरतो.
डीलिंग: याचा संदर्भ प्रत्येक खेळाडूला प्रत्येक खेळाच्या फेरीच्या सुरुवातीला पत्ते वाटणाऱ्याकडून पत्ते वितरीत करण्याशी आहे). पत्ते वाटणाऱ्याची निवड करण्यासाठी टॉस केल्यानंतर पत्ते वाटणे (डीलिंग:) सुरु होते.
पत्ते वाटणारा: डावाच्या सुरुवातीला जो खेळाडू पत्ते वाटतो त्याला डीलर म्हणतात. ऑफलाईन खेळामध्ये, खेळाचा डीलर कोण असावा हे खेळाडू स्वतःच ठरवतात किंवा तो निवडण्यासाठी टॉस करतात.
डेक:: याचा संदर्भ पत्त्यांच्या गड्डीशी आहे. नियमित रमीच्या गड्डीत 52 पत्ते असतात. 13-पत्त्यांच्या रमी मध्ये, दोन छापील जोकर असलेल्या पत्त्यांच्या दोन गड्डी असतात.
घोषित करणे: जेंव्हा एखादा खेळाडू 13-पत्त्यांच्या रमीचा डाव पूर्ण करतो, तेंव्हा तो/ती स्लॉट संपविण्यासाठी एक पत्ता टाकून देऊन डाव पूर्ण करतो/करते आणि आपले पत्ते विरुद्ध स्पर्धकांना दाखवतो/दाखवते.
टाकून देणे: प्रत्येक खेळाडूंवर ही चाल आल्यावर, त्याने/तिने गड्डीतील किंवा खाली टाकलेल्या पत्त्यांमधून एका पत्ता घ्यावयाचा असतो आणि टाकलेल्या पत्त्यांवर एका पत्ता दिसेल अशा पद्धतीने टाकायचा असतो. खाली टाकलेल्या पत्त्यांवर एका पत्ता ठेवणे याला पत्ता टाकून देणे असे म्हणतात.
टाकून दिलेले पत्ते/ओपन डेक: टाऊन दिलेले पत्ते/ओपन डेक मध्ये खेळाडूंनी टाकून दिलेले पत्ते समाविष्ट असतात, फक्त अगदी सुरुवातीचा पत्ता सोडून. ते उलट ठेवलेल्या पत्त्यांच्या गड्डी शेजारीच असतात आणि एका पत्ता दिसेल असा ठेवलेला असतो. खेळाच्या सुरुवातीला पत्ते वाटल्यानंतर, ओपन डेक बनविण्यासाठी उरलेल्या पत्त्यांमधून एक पत्ता वर दिसेल असा ठेवलेला असतो. खेळाडू डिसकार्ड गड्डीवर वर ठेवलेला पत्ता उचलू शकतात किंवा ते क्लोज्ड डेक मधून पत्ते काढू शकतात.
पत्ता काढणे: खेळाडूची चाल आल्यावर, त्याने/तिने ओपन डेक अथवा क्लोज्ड डेक मधून एका पत्ता घ्यावयाचा असतो. या प्रक्रियेला पत्ता काढणे म्हणतात.
ड्रॉप: खेळ संपण्याअगोदर खेळाडूला खेळ सोडून देण्याचा पर्याय उपलब्ध असतो, त्याला ड्रॉपिंग म्हणतात. ऑनलाईन रमीमध्ये, खेळाडू त्यांची चाल आल्यावर "drop" बटन दाबून खेळ सोडू शकतात.
फेस कार्ड: सर्व सूट मधील राजे, राण्या, एक्के आणि गुलाम यांना फेस कार्ड म्हणतात.
फुल काउंट: फुल काउंट म्हणजे जास्तीत जास्त संभाव्य गुण जे एका खेळाडूने डाव/डील/खेळ यामध्ये त्यांच्या हातात असलेल्या पत्त्यांच्या एकूण मूल्याची पर्वा न करता मिळवता येतात.
हात: एखाद्या खेळाडूला खेळाच्या सुरुवातीला जे पत्ते वाटले जातात त्याला हात म्हणतात. प्रत्येक खेळाडूने त्याच्या/तिच्या हातातील पत्ते क्रमवारीने आणि/किंवा संचामध्ये लावावयाची असतात.
इम्प्युअर सिक्वेन्स: एकाच सूट मधील सलग तीन अथवा अधिक पत्त्यांचा जोकरसह बनलेला गट, त्याला इम्प्युअर सिक्वेन्स म्हणतात.
जोकर: जोकर हा एका असा पत्ता आहे जो रमी खेळामध्ये गहाळ पत्त्याच्या जागी पर्यायी पत्ता म्हणून वापरला जाऊ शकतो. तुम्ही त्याचा उपयोग इम्प्युअर सिक्वेन्स बनविण्यासाठी करू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 5, 7 आणि 8 आहे, तुम्हाला अनुक्रम बनविण्यासाठी 6 ची आवश्यकता आहे. परंतु अनुक्रम पूर्ण करण्यासाठी तुम्ही जोकरचा देखील उपयोग करू शकता.
एकत्र करणे: Melding ही वैध अनुक्रम आणि संच यामध्ये पत्ते लावण्याची प्रक्रिया आहे.
पपलु: भारतीय रमी ला भारताच्या काही भागात पपलु म्हणून संबोधले जाते. भारतीय रमी/पपलु हे खेळाच्या अमेरिकन आणि युरोपियन आवृत्ती पेक्षा थोडे वेगळे आहे.
गुण: एक गड्डी मध्ये 52 पत्ते असतात आणि प्रत्येक पत्त्याचे ठराविक मूल्य असते. क्रमांकित पत्त्यांमध्ये त्यांच्यावरील संख्येइतकीच मूल्ये असली तरी, फेस कार्ड, अर्थात जोकर, राणी, राजा आणि एक्का यांचे प्रत्येकी 10 गुण असतात. रमी खेळात ऋण गुण देखील असतात. एक खेळाडू जो त्यांचे सर्व कार्ड यशस्वीरित्या आयोजित करतो शून्य गुण मिळवतो आणि गेम जिंकतो.
गुणांचे मूल्य: गुणांचे मूल्य हे रमी खेळामधील पूर्व-निर्धारित मूल्य आहे जे एखाद्या खेळाडूचा अंतिम विजय निश्चित करण्यात मदत करते. विजेता ठरविण्यासाठी आम्ही खालील सूत्र वापरतो.
जिंकणे = सर्व विरोधी स्पर्धकांच्या गुणांची बेरीज X प्रत्येक पॉईन्टचे मूल्य रुपयामध्ये - Junglee Rummy शुल्क
पॉईंट रमी: पॉईंट रमीला स्ट्राईक्स रमी म्हणून देखील ओळखले जाते. हा सर्वात वेगवान रमीचा प्रकार आहे कारण गेम फक्त काही मिनिटांसाठी चालतो. एक टेबलवर 6 खेळाडूंपर्यंत खेळू शकतात. खेळ जिंकण्यासाठी त्यांना त्यांचे पत्ते पटकन लावावे लागतात. हा खेळ गुणांवर केंद्रित आहे आणि प्रत्येक गुणाचे रुपयांमध्ये एक विशिष्ट मूल्य आहे. हरणार्200dया खेळाडूंसाठी, गुण त्यांच्या न जुळणाऱ्या पत्त्यांच्या आधारे मोजले जातात.
पूल रमी: पूल रमीमधील बक्षिसाची रक्कम पॉईंट रमीपेक्षा मोठी आहे. डावांची निश्चित संख्या नसलेला हा एक सर्वसमावेशक खेळ आहे. जे खेळाडू ठराविक गुणांपर्यंत पोहोचल्यानंतर ते बाद होतात. उदाहरणार्थ, 101 आणि 202 पॉईंट रमीमध्ये, अनुक्रमे 101 पॉईंट आणि 202 पॉईंटवर पोचल्यावर खेळाडू बाद होतात. प्युअर सिक्वेन्स: जोकरशिवाय एकाच सूटच्या तीन किंवा अधिक सलग पत्त्यांच्या तयार झालेल्या गटाला प्युअर सिक्वेन्स म्हणतात.
रमी टूर्नामेंट: रमी स्पर्धा अत्यंत स्पर्धात्मक असतात आणि 5 फेऱ्यांपर्यंत टिकू शकतात. स्पर्धांमध्ये फ्रीरोल/विनामूल्य प्रवेश स्पर्धा आणि रोख रकमेच्या स्पर्धांचा समावेश होतो. बक्षीसामध्ये खरे पैसे जिंकण्यासाठी खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात. प्रत्येक स्पर्धा एका मानक प्रक्रियेचे अनुसरण करते - सर्वाधिक चिप असलेले खेळाडू पुढील फेरीत जातात.
सेट: एकाच श्रेणीच्या पण वेगवेगळ्या सूटच्या तीन किंवा चार पत्त्यांच्या गटाला सेट म्हणतात..
सिक्वेन्स: सिक्वेन्स म्हणजे एकाच सूटच्या सलग पत्त्यांचा गट. तो प्युअर किंवा इम्प्युअर असू शकतो.
शफलिंग: ही पत्त्यांची यादृच्छिकता राखण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे. हे ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष पत्त्यांद्वारे असे दोन्ही पद्धतींनी केले जाते. तुम्ही प्रत्यक्ष पत्त्यांचे फेस डाऊन करून पुन्हा पुन्हा एकमेकांवर सरकवून पिसू शकता.
सूट: एकच रंग आणि एकच चिन्ह असलेल्या 13 पत्त्यांच्या संचास सूट म्हणतात. तीन किंवा चार सूट्स: बदाम (?), चौकट (?), इस्पिक (?), आणि किल्वर (?).
न जुळलेले पत्ते: ते पत्ते जे हारत असलेला खेळाडू खेळाच्या शेवटपर्यंत संचामध्ये अथवा सिक्वेन्समध्ये लावण्यात अपयशी ठरतो, त्या पत्त्यांना न जुळलेले पत्ते म्हणतात.
वाइल्ड जोकर: पत्ते वाटणाऱ्याने पत्ते वाटून झाल्यावर जोकर म्हणून निवडलेल्या पत्त्याला वाइल्ड जोकर म्हणतात. सिक्वेन्स अथवा संच बनविण्यासाठी ते कोणत्याही पत्त्यास पुनर्स्थापित करू शकतात.
आम्हाला आशा आहे की आमची रमी विकी तुम्हाला रमीमध्ये उपयोगात आणलेल्या सर्व तांत्रिक संज्ञा समजून घेण्यास मदत करेल. आता तुम्ही खेळ खेळण्यास खूपच उत्सुक झाला असाल. जर तुम्हाला ऑनलाइन रमी खेळायची इच्छा असेल, तर तुम्ही निश्चितपणे Junglee Rummy वापरून पहावे. आम्ही तुमच्या बोटांवर रमी गेमची व्यापक श्रेणी ऑफर करतो. आणखी, आम्ही आमच्या सर्व वापरकर्त्यांसाठी गेमिंगचे सुरक्षित वातावरण पुरवतो. तुमच्या पसंतीच्या डिव्हाइसवर रमी ॲप डाऊनलोड करा आणि अमर्यादित मजा आणि मनोरंजनाच्या जगामध्ये प्रवेश करा.
आमच्याशी जोडले जा
आम्हाला आशा आहे की आमची रमी विकी तुम्हाला रमीमध्ये उपयोगात आणलेल्या सर्व तांत्रिक संज्ञा समजून घेण्यास मदत करेल. रमी विकीमध्ये वापरल्या गेलेल्या कोणत्याही संज्ञांविषयी तुम्हाला काही शंका असल्यास, तुम्ही "हेल्प" विभागात असलेल्या "कॉन्टॅक्ट अस" वैशिष्ट्याचा वापर करून कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्हाला तुम्हास मदत करण्यात आनंदच होईल.